नाशिक लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२५ । राज्यातअल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नसून अशातच नाशिकमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नाशिकच्या ओझर टाऊनशिपमध्ये घरात घुसून अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. कुणाला सांगू नये म्हणून त्या नराधमांनी तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या ओझर टाऊनशिपमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कार केल्यानंतर पाच संशयित आरोपी फरार झाले आहेत. या धक्कादायक घटनेनंतर नाशिकमधील ओझर टाऊनशिप परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. पोलिसांची तीन ते चार पथके आरोपींचा शोध घेत आहेत. सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे नाशिकमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील गुन्हेगारी कधी संपणार? असा सवाल सर्वसामान्य विचारत आहेत.
मुलगी घरात एकटी असल्याचे पाहिले अन् पाच नराधमांनी डाव साधला. आई मजुरी काम करण्यासाठी गेली होती, त्यामुळे मुली घरात एकटीच होती. हाच डाव साधत पाच जणांनी घरात घुसून कुकर्म केले. नराधमांनी अल्पवयीन मुलीच्या शरीराचे लचके तोडले. या प्रसांगाबाबत कुणाला सांगितले तर जिवे मारून टाकू अशी धमकी त्या आरोपींनी मुलीला दिली होती.