---Advertisement---

तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या मैत्रीणींचा पाण्यात बुडून मृत्यू ; दिंडोरीतील दुर्दैवी घटना

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२५ । नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील सारसाळे येथे पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी मैत्रीणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. गायत्री धनराज घुटे (१२) व राधिका एकनाथ वटाणे (१२) (दोघी रा. सारसाळे ता. दिंडोरी)असं मयत मुलींचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेबाबत असे की, सारसाळे येथील तीन मैत्रीणी कपडे धुण्यासाठी पाझर तलावावर गेल्या होत्या. यातील गायत्री घुटे आणि राधिका एकनाथ वटाणे या पाय घसरून पाण्यात पडल्या. तिसऱ्या मुलीने आरडाओरड केल्याने नागरिकांनी धाव घेत दोघींनाही पाण्यातून बाहेर काढत वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली असून पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अकस्मात मृत्युची नोंद केली. वणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना केल्या असून त्यानुसार तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---