---Advertisement---

चोरीच्या 21 दुचाकींसह चौघा संशयितांच्या मालेगाव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

gd
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । जायखेडा परिसरासह मालेगाव (Malegaon) व साक्री तालुक्यातील वेगवेगळ्या भागांतून दुचाकी चोरून ग्रामीण भागात विक्री करणाऱ्या चार संशयितांना मालेगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या कारवाईत २१ दुचाकी व चार मोबाइल हस्तगत करण्यात यश आले असून, अजूनही दुचाकी मिळण्याची शक्यता गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी प्रसाद दिलीप पाटील (वय १७), आबा पंडित खैरनार (वय ३५, रा. जायखेडा), सतीश चंद्रभान सोनवणे (वय ३६), अविनाश वामन सोनवणे (वय २२) वाडीपिसोळ यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान २१ पेक्षा जास्त दुचाकी संशयितांनी चोरून ग्रामीण भागात विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कसून चौकशी करीत जायखेड्यासह विविध भागांत विक्री केलेल्या २१ दुचाकी जप्त केल्या आहेत. जायखेडा पोलिसात चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---