---Advertisement---

नाशिकमध्ये भीषण अपघात ; एकाच कुटुंबातील तिघांसह चौघे ठार

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२५ । नाशिक जिल्ह्यातून भीषण अपघाताची एक घटना समोर आलीय. गुरुपौर्णिमेला नाशिकच्या इगतपुरीतील शेणवडमधील गरुडेश्वरच्या माउली रामदासबाबा मठातील मंदिरातून दर्शन घेऊन मुंबईकडे परतताना कंटेनरने कारला दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांसह चौघे ठार झाले. नाशिक- मुंबई महामार्गावर मुंढेगाव फाट्यावर हा अपघात झाला.

अपघातात नित्यानंद जनार्दन सावंत (६२), विद्या जनार्दन सावंत (६५), मीना जनार्दन सावंत (६८), इकोचालक दत्ता अंबराळे, (४२, सर्व रा. अंधेरी, मुंबई) यांचा मृत्यू झाला. अंधेरी येथील ८ ते १० भाविक दोन खासगी कारने मठामध्ये दर्शनासाठी आले होते.

दर्शन घेतल्यानंतर ते घरी परताना इको कार (एमएच ०२/ सीव्ही ५२३०) महामार्गावर येताक्षणीच राख घेऊन येणाऱ्या बल्गर कंटेनरने (एमएच १५/ जेडब्लू १०९०) कारला जोरदार धडक दिली. यात कारचा चक्काचूर झाला, कंटेनर उलटला. यात कारमधील तिन्ही भावंडांसह चालकाचा जागीचा मृत्यू झाला.
तिन्ही सावंत भावंडे अविवाहित होती. नित्यानंद सावंत मुंबई महापालिकेत, विद्या सावंत बृहन्मुंबई टेलिनिगम (एमटीएनएल) मधील निवृत्त कर्मचारी आहेत. अपघातानंतर कंटेनरचालक सुरेंद्र कुमार वर्मा याला घोटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मद्यपान करून तो कंटेनर चालवत होता, असा संशय आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---