---Advertisement---

येवल्यात एक कोटी रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त

madyasatha
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारातील टोलनाक्याजवळ वाहनांची तपासणी सुरू असताना शनिवारी रात्री मध्य प्रदेश निर्मित महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधीत व केवळ मध्य प्रदेश राज्यातच विक्रीकरिता असलेला विदेशी मद्यसाठा एक कोटी रुपयांचा मुद्देमाल ट्रकसह जप्त करण्यात आला आहे

मध्य प्रदेशातून विदेशी मद्यसाठ्याची महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाच्या भरारी पथकाने येवला येथे मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे

राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारात वाहन तपासणी सुरू असताना मध्य प्रदेश निर्मित महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित व केवळ मध्य प्रदेश राज्यातच विक्रीकरिता असलेला मुद्देमाल कंटेनरसह जप्त करण्यात आला आहे. यात विदेशी मद्य ११४१ बॉक्स तपकिरी रंगाची ट्रक (एमएच २० इएल ६७९१), एक मोबाइल संच असा एकूण एक कोटी ७ लाख ७२ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शंभूसिंह भेरूसिंह राजपूत (३३, रा. बस्सी पो.ता. सलंबर, जि. उदयपूर, राजस्थान) यास ताब्यात घेतले असून अज्ञात वाहनमालक फरार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास किरण धिंदळे हे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---