---Advertisement---

नाशिकमध्ये २० इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनकरिता दर निश्चित ; असे आहेत दर?

chargin
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक शहरात उभारण्यात येत असलेल्या २० इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनकरिता दर निश्चित करण्यात आला असून नाशिक महापालिकेने चार्जिंग स्टेशनकरिता १६.६० रुपये प्रति युनिट दर निश्चित केला आहे. मात्र ६ महिन्यांनंतर वीज दराबाबत पुनरावलोकन करून चार्जिंगच्या दराची फेररचना केली जाणार आहे.

केंद्र शासनाच्या एन कॅप योजनेंतर्गत प्राप्त ८० कोटी रुपयांच्या निधीतून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. यातीलच १० कोटी रुपयांमधून निधीमधून महापालिकेने शहरात २० ठिकाणी इ लेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभरण्यात येत आहेत. चार्जिंग स्टेशन तयार झाले असले तरी महावितरणकडून वीज कनेक्शन घेऊन वीज मीटर बसविण्यात येत आहे. इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करताना होणारे वीज वापराचे बिल पालिकेमार्फत अदा केले जाणार आहे.

सद्यस्थितीत १५ इ-चार्जिंग स्टेशनचे कामे पूर्ण झाली आहेत. १० ठिकाणी वीजजोडणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, ५ ठिकाणी तांत्रिक अडचण आल्याने चार्जिंग स्टेशन उभारण्यास विलंब होत आहे. महावितरणकडून खासगी चार्जिंग स्टेशनसाठी सर्वसाधारणपणे २७ रुपये प्रति युनिट विजेचा दर घेतला जातो. मात्र इ-चार्जिंगला प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेने १६.६० रुपये प्रति युनिट दर निश्चित केले आहेत. यासंदर्भातील विद्युत विभागाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. महावितरणकडून वेळोवेळी होणाऱ्या वीज दरवाढीनुसार प्रति युनिट दरवाढ करण्याचा निर्णयही स्थायी समितीने घेतला आहे.

चार्जिंग स्टेशनचे दर असे….
मनपाच्या ईव्ही चार्जिंग स्टेशनची क्षमता : ८० केव्ही
ईव्ही चार्जिंगसाठी सरासरी वीज वापर दर (प्रतियुनिट) : १३.१२ रुपये
खासगी ईव्ही चार्जिंगचे दर (प्रति युनिट): २३.५० रुपये
नाशिक महापालिकेने निश्चित केलेले दर (प्रति युनिट) : १६.६०₹

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---