नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक शहरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यातच एकाच दिवशी पाच दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. पंचवटीमधून ३, मुंबईनाका, गंगापूर रोड परिसरातून प्रत्येकी १ दुचाकी चोरी करण्यात आली. संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल निकम (रा. कामटवाडे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, यांची दुचाकी दुपारी ३.३० वाजता यशवंत महाराज पटांगण गोदाघाट येथील पार्किंगमधून चोरी झाली. अशोक देवकर (रा. इंद्रकुंड) यांची दुचाकी रात्री ८ वाजता संजिवन समाधी मंदिर, म्हसोबा पटांगण, गोदाघाट चोरी आला निबचत शेवाळे करण्यात गोपाळनगर, अमृतधाम) हे दुचाकीवरून पडल्याने दुचाकी अमृतधाम चौफुली येथे उभी करुन दवाखान्यात गेले असता त्यांची दुचाकी चोरी करण्यात आली.
मुर्तुजा कादरी (रा. खोडेनगर) यांची दुचाकी इमारतीच्या पार्किंगमधून चोरी करण्यात आली. सिमा वाघ (रा. गंगापूररोड) यांची दुचाकी सोमेश्वर मंदिर पार्किंगमधून चोरी करण्यात आली. अधिक तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे