---Advertisement---

Breaking : नाशिकमध्ये नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार आणि दगडफेक ; हल्लेखोर CCTV मध्ये कैद

new project (1)
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२५ । नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात दिंडोरी रोडवरील नामवंत बिल्डरच्या घरावर पहाटेच्या सुमारास अज्ञात दोघांकडून गोळीबार आणि दगडफेक करण्यात आली आहे. यानंतर अज्ञात दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. ही सर्व घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. या हल्ल्याचं कारण मात्र अद्याप समजलेलं नाही. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या दिंडोरी रस्त्यावर एका नामवंत बिल्डरचं घर आहे. आज शुक्रवारी पहाटे ४ वाजून ३७ मिनिटांनी त्यांच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार आणि दगडफेक केली आहे. गोळीबारानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. मात्र भल्या पहाटे अशाप्रकारे गोळीबार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या गोळीबाराचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओत दोन तरुण शुक्रवारी पहाटे ४ वाजून ३७ मिनिटांनी बिल्डर राहत असलेल्या परिसरात आले. दोघांनी आपली ओळख लपवण्यासाठी तोंडाला कपडा बांधला होता. दरम्यान, एकाने बंदूक काढून बिल्डरच्या घराच्या दिशेनं गोळीबार केला. तर दुसऱ्या हल्लेखोराने दगडफेक केली. गोळीबार गेल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट नसले तरी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---