---Advertisement---

Nashik : फळपीक विमा योजना लाभासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करावी

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२५ । पुर्नरचित हवामानावर आधारित फळप‍ीक विमा योजना जिल्ह्यात बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात आंबिया बहार सन 2024-25 मध्ये द्राक्ष, डाळिंब, केळी, काजू, आंबा, स्ट्रॉबेरी या 6 फळ पीकांसाठी हवामान धोक्याच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी 25 एप्रिल 2025 पर्यंत फळपीकांची ई-पीक पाहणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशिद यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

पुर्नरचित हवामानावर अधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे परंतु फळ पीकांची ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल ॲपद्वारे केलेली नाही त्यांनी ती 25 एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करावी अन्यथा 12 जून 2024 रोजीच्या शासन निर्णय मधील तरतुदीनुसार 7/12 उताऱ्यावर ई-पीक पाहणी नोंद नसलेले सर्व पीक विमा अर्ज रद्द करण्यात येतील. या बाबतीत सविस्तर माहिती शासन निर्णयात नमूद केलेल्या आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---