---Advertisement---

शेतकरी समृद्धी रेल्वेला कसबे सुकेणे स्थानकावर थांबा; असे आहे वेळापत्रक

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२५ । देवळाली ते दानापूर या शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे सेवेला निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. यापूर्वी लासलगाव येथे समृद्धी विशेष रेल्वे गाडीस शेतकऱ्यांच्या मागणीनुसार थांबा देण्यात आलेला आहे.

प्रत्येक शनिवारचे असे आहे वेळापत्रक
मध्य रेल्वे प्रशासनाने शेतकरी आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी देवळाली ते दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे गाडीचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 01153 देवळाली ते दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे शनिवार दि. 8 मार्च ते शनिवार, दि. 12 एप्रिलपर्यंत प्रत्येक शनिवारी देवळाली येथून रात्री 8:25 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दानापूर येथे पहाटे 5:15 वाजता पोहचेल.

प्रत्येक सोमवारचे असे आहे वेळापत्रक
गाडी क्रमांक 01154 दानापूर ते मनमाड शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे सोमवार, दि. 10 मार्च ते सोमवार, दि.14 एप्रिलपर्यंत प्रत्येक सोमवारी दानापूर येथून सकाळी 10:00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मनमाड येथे सकाळी 10:30 वाजता पोहचेल. देवळाली ते दानापूर या शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे सेवेला आता लासलगावबरोबरच कसबे सुकेणे स्थानकावर थांबा मिळाला आहे. देवळाली ते दानापूर विशेष रेल्वे कसबे सुकेणे येथे रात्री 9:05 वाजता येईल आणि प्रस्थान 9:10 वाजता राहणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---