---Advertisement---

नाशिक जिल्ह्यात ५०० रुपयाच्या बनावट नोटा जप्त

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ५०० रुपयाच्या बनावट ३० नोटा चलनात आणणाऱ्या दोन संशयितांना छावणी पोलिसांनी अटक केली आहे. १० एप्रिलला दाखल गुन्ह्याच्या तपासात संशयित नवाज फैजुल्ला खान व फय्याज अहमद रियाज अहमद यांची नावे निष्पन्न झाली. दोघांना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नवाज हा मारहाणीच्या गुन्ह्यात फरार असलेला माजी नगरसेवक फारुख फैजुल्ला खानचा भाऊ आहे.

सटाणारोड भागातील एचडीएफसी बँकेत ५०० च्या बनावट नोटा आढळून आल्या होत्या. यासंदर्भात बँकेने पोलिसांकडे तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे सहायक पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी शोध सुरू केला होता. या नोटा संशयित नवाज खान व फय्याज अहमद यांनी बँकेत डिपॉझीट केल्याचे समोर आले. याचे पुरावे हाती लागल्याने पोलिसांनी दोघांना शुक्रवारी अटक केली होती. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी पुन्हा हजर करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---