---Advertisement---

Malegaon : नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणारा तोतया जिल्हाधिकारी पोलिसांच्या जाळ्यात

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२५ । एकीकडे सायबर ठगांकडून नागरिकांना विविध प्रकारचे आमिष दाखवून गंडविले जात असल्याच्या घटना सातत्याने समोर येत असताना आत नाशिकच्या मालेगावातून तोतया जिल्हाधिकाऱ्याने सरकारी जागेवर घरे बांधून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लाखो रुपयांना गंडा घातला असून त्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. रिंकल नरेश रजक उर्फ अब्दुल रहेमान असे अटक करण्यात आलेल्या तोतया जिल्हाधिकाऱ्याचे नाव आहे.

विशेष म्हणजे मुस्लिम नाव धारण करून तो मालेगावमध्ये मागील काही दिवसांपासून वास्तव करीत होता. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरु आहे. रिंकल याने मालेगावातील नागरिकांशी संपर्क वाढवत त्याने आपली नाशिकच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती होणार आहे. तसेच नाशिक विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याची बतावणी केली. वरचा अधिकारी असल्याचे सांगितल्याने त्याच्या सांगण्यावर नागरिकांनी विश्वास ठेवला.

विश्वास संपादन करत रिंकल याने मालेगावच्या जाफर नगर भागात सरकारी जागा ९९ वर्षाच्या करारावर घेऊन त्या ठिकाणी वसाहत बांधण्यात येत आहे. याठिकाणी बांधण्यात येत असलेल्या वसाहतमध्ये घरकुल नावावर करण्यासाठी तसेच नोकरी लावून देण्याचे आमिष त्याने दाखविले. यासाठी त्याने अनेकांकडून पैशांची मागणी करत लाखो रुपयांना गंडा घातल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

दरम्यान रिंकल याने दिलेला शब्द पूर्ण होत नसल्याने त्याच्यावर संशय आला. यामुळे काहींनी पोलिसात तक्रारी दाखल केल्या होत्या. याचा तपास करत पोलिसांनी त्यास अटक करून त्याच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्याकडून लाखो रुपयांची रोकड व महागडी कार हस्तगत केल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिस त्याची सखोल चौकशी करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---