---Advertisement---

Nashik : गल्ली राहयचे असेल तर एक लाखांची खंडणी दे, नाहीतर.. ; व्यावसायिकाला धमकी, गुन्हा दाखल

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. यातच खंडणीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गल्ली राहयचे असेल तर एक लाखांची खंडणी द्यावी लागले, अशी धमकी देत सराईताने किराणा व्यावसायिकाच्या घरावर दगडफेक करत कारची तोडफोड केल्याचा प्रकार सराफ बाजारात घडला. संशयिताच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विराज उर्फ राज जगदीश जंगम असे या संशयिताचे नाव आहे.

संशयित फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. राहुल तिवारी (रा. तिळभांडेश्वर मंदिर, सराफ बाजार) यांच्या तक्रारीनुसार परिसरात त्यांचे किराणा आणि जनरल स्टोअर्स दुकान होते. संशयित दुकानावर येऊन किराणा माल, अन्य वस्तू बळजबरीने घेऊन जात होता. भीतीपोटी तक्रार केली नाही. वडील वारल्यानंतर दुकान बंद केले. संशयिताने घरी येत १ लाख रुपये खंडणी द्यावी लागले, अशी धमकी दिली. उद्या सकाळपर्यंत पैसे दिले नाही तर जीव घेतो, अशी धमकी देऊन निघून गेला. सायंकाळी तिवारी यांचा मुलगा अथर्व यास संशयिताने मारहाण केली. रात्री पुन्हा घराजवळ येऊन घरावर दगडफेक व थार गाडीची तोडफोड केली.

पोलिसांनी दिली हिंमत
तिवारी यांनी भीतीपोटी पोलिसांत तक्रार दिली नाही. घरावर दगडफेकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तिवारींशी संपर्क साधून भीती न बाळगता तक्रार देण्यास सांगितले. तिवारी यांच्या तक्रारीनुसार संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---