सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने स्पेशलिस्ट ग्रेड २ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता अर्ज करावा. ESIC Recruitment 2025
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ५५८ रिक्त पदे भरली जातील. लक्षात असू द्या अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. पात्र उमेदवार २६ एप्रिल २०२५ पर्यंत ऑफलाइन अर्ज करू शकतात. काही विशेष राज्यांसाठी अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख २ मे २०२५ निश्चित करण्यात आली आहे. ESIC Bharti 2025
रिक्त पदांची माहिती
स्पेशालिस्ट ग्रेड-II (वरिष्ठ श्रेणी) – १५५ पदे
स्पेशालिस्ट ग्रेड-II (कनिष्ठ स्केल) – ४०३ पदे
भरतीसाठी पात्रता काय?
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एमडी/एमसीएच / डीए / एमएससी / डीपीएम पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे असावी.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
इतकी परीक्षा फी लागेल?
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
किती पगार मिळेल?
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना वेतन स्तर १२ (७ वा वेतन आयोग) अंतर्गत दरमहा ७८,८०० रुपये प्रारंभिक वेतन मिळेल. याशिवाय, टीए, डीए, एनपीए, एचआरए सारख्या सर्व सुविधा देखील वेळोवेळी उपलब्ध असतील.
असे अर्ज करा
भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने केली जात आहे. उमेदवारांना ESIC च्या अधिकृत वेबसाइट esic.gov.in च्या भरती विभागातून अर्ज डाउनलोड करावा लागेल. यानंतर, अर्ज योग्यरित्या भरावा लागेल आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित पत्त्यावर पाठवावा लागेल.