नाशिक लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२५ । नाशिकमार्गे धावणाऱ्या महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली. रेल्वेनं हजूर साहिब नांदेड-मुंबई सीएसएमटी राज्य राणी एक्सप्रेसला नवीन कोच रचनासह अपग्रेड केले आहे. प्रवाशांच्या आरामात वाढ करण्यासाठी आता या ट्रेनमध्ये एसी सीटिंग आणि नॉन-एसी जनरल सीटिंग कोच असतील.
हजूर साहिब नांदेड-मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्य राणी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वे – दक्षिण मध्य रेल्वे झोनमधील महत्त्वाची एक्स्प्रेस आहे. ही ट्रेन राज्य राणी एक्सप्रेस श्रेणीतील एक एक्सप्रेस ट्रेन आहे. ही एक्स्प्रेस भारतातील हजूर साहिब नांदेड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावते.
आधी ही एक्स्प्रेस मनमाड ते लोकमान्य टर्मिनस दरम्यानचा प्रवास करायची मात्र त्यानंतर या ट्रेनचा प्रवास वाढवण्यात आला. आता राज्य राणी एक्सप्रेस ट्रेन आता नव्या रुपात येणार आहे. या एक्स्प्रेसचा आसान व्यवस्थे बदल करण्यात आलाय. रेल्वे मुंबई – नांदेड राज्यराणी एक्सप्रेस सुधारित संरचनेसह चालवली जाणार आहे. त्यामध्ये १ वातानुकूलित सीटींग श्रेणी (बैठक व्यवस्था) आणि २ सीटींग सामान्य श्रेणी (वातानुकूलित नसलेले) यांचा समावेश असणार आहे.
रेल्वे यापुढे ट्रेन क्रमांक १७६१२ / १७६११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हजूर साहिब नांदेड राज्यराणी एक्सप्रेस सुधारित रचनेसह चालवली जाणार आहे. नवीन संरचनेत १ वातानुकूलित सीटींग श्रेणी (बैठक व्यवस्था) आणि २ सीटींग सामान्य श्रेणी (वातानुकूलित नसलेले) समावेश असणार आहे.
सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे –
ट्रेन क्रमांक 17612 / 17611 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हजूर साहिब नांदेड राज्यराणी एक्सप्रेसची सुधारित संरचना
संरचना: १ प्रथम वातानुकूलित व द्वितीय वातानुकूलित श्रेणी, १ द्वितीय वातानुकूलित श्रेणी, ३ तृतीय वातानुकूलित श्रेणी, १ वातानुकूलित आसन व्यवस्था श्रेणी (चेअर कार), ५ शयनयान श्रेणी, २ आरक्षित नॉन-एसी चेअर कार, २ सामान्य द्वितीय श्रेणी (अनारक्षित) आणि २ द्वितीय आसन व्यवस्था व सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.
ट्रेन क्रमांक १७६१२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हजूर साहेब नांदेड राज्यराणी एक्सप्रेस ५.०८.२०२५ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुधारित संरचनेसह धावेल.
नांदेड-मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्य राणी एक्सप्रेस भारतीय रेल्वे – दक्षिण मध्य रेल्वे झोनमधील राज्य राणी एक्सप्रेस श्रेणीतील एक ट्रेन आहे. ही एक्स्प्रेस हजूर साहिब नांदेड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावते. हजूर साहिब नांदेड-मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्य राणी सुपरफास्ट एक्सप्रेस ५९४ किलोमीटरचा प्रवास करते. ही एक्स्प्रेस ५९४ किलोमीटरचं अंतर १२ तास ०० मिनिटांत (५५.४७ किमी/तास) पूर्ण करते. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेनचा सरासरी वेग ५५ किमी/तास पेक्षा जास्त असतो.