---Advertisement---

नाशिकमधील ‘या’ गावाला भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकमधील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) तालुक्यातील हरसूल व परिसरात आदिवासी दुर्गम भागात अनेक गावांना भूकंपाचे (Earthquakes) वारंवार धक्के बसणे चालूच आहे. यातच २५ जानेवारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर सायंकाळी व रात्री पुन्हा थोड्या प्रमाणात धक्के बसले. त्या मोठ्या धक्क्याची मेरी येथील भूकंप मापक केंद्रात रिश्टर स्केलवर २.६ इतकी नोंद झाली आहे. या भूकंपानंतर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

मागील एक महिन्यापासून हरसूल परिसराला बसणारे भूकंपाचे धक्के व गूढ आवाजामुळे ग्रामस्थ घाबरले आहेत. प्रशासन मात्र अजूनही गाफील असल्याचा आरोप करत परिसरातून संताप व्यक्त केल जात आहे. गूढ आवाजा का येतात याचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनासमवेत झालेल्या बैठकीत केली होती. मागील आठवड्यात जिओलॉजी सर्वे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांनी हरसूल व परिसरात शासनाच्या वतीने भेट देऊन जमिनीखालून बसणाऱ्या हादऱ्यांचा अभ्यास केला.

परंतु त्याचा अहवाल शासनाला न दिल्याने हरसूल व परिसरातील ग्रामस्थांना भूगर्भातील या हालचाली व आवाजांचे कारण कळू शकलेले नाही. वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांबाबत कुठलीही उपाययोजना करता येत नसल्याने ग्रामस्थांच्या तक्रारीला उत्तर देताना प्रशासनही हतबल झाले आहे. त्यामुळे तरुण स्वतःहून परिसरात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतरच्या प्राथमिक खबरदारीबाबत जनजागृती करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---