नाशिक लाईव्ह न्यूज । १६ मे २०२५ । नाशिक शहरातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. ज्यात एका तरुणीने भररस्त्यात अश्लील भाषा आणि पोलिसांना शिवीगाळ करत धिंगाणा घातला. तरुणीच्या या धिगाणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ही घटना व्हायरल होताच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
नाशिकच्या मुंबई नाका परिसरात हा प्रकार रात्री ११ च्या सुमारास घडला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणी रस्त्याच्या मध्यभागी बसलेली दिसते आणि ती पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असल्याचं स्पष्ट दिसतं. या अवस्थेत तरुणी आजूबाजूच्या नागरिकांशी अर्वाच्य भाषेत बोलताना आढळते. तिच्या अशा वर्तनामुळे परिसरात एकच गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळतं.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडीओ(Video) शिवाय साक्षीदारांच्या अहवालावरून संबंधित तरुणीवर सार्वजनिक शांतता भंग, पोलिसांशी असभ्य वर्तन आणि मद्यपानासंबंधित गुन्ह्यांनुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. शिवाय व्हिडिओ पाहताच नागरिकांनीही अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.