---Advertisement---

मोठी बातमी ! धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२५ । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर 82 दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दोन सहकाऱ्यांकडून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. तेव्हाच विरोधकांनी ही अत्यंत क्रूर हत्या झाल्याचा आरोप केला होता. काल समाज माध्यमांवर सीआयडीच्या दोषारोपपत्रा सोबतचे फोटो समोर आले. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर, महाराष्ट्राभरातून संतापाची लाट उसळली होती.

त्यानंतर आज सकाळपासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. धनंजय मुंडे यांना कालच राजीनामा दिल्याचा दावा करण्यात येत होता. तर आज सकाळपासून विरोधकांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. यातच धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---