नाशिक लाईव्ह न्यूज । दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. निकाल चकित करणारा ठरला आहे. भाजपला दिल्लीमध्ये आपच्या सत्तेला सुरुंग लावण्यास यश आले आहे. निकालाच्या ताज्या आकडेवारीनुसार, ७० विधानसभा जागा असलेल्या दिल्लीत भाजप ४७ जागांवर विजय मिळविला आहे तर आम आदमी पक्षाचे २३ जागा निवडून आल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेसला मात्र एकही जागा जिंकता आली नाहीय. या निकालानंतर आता दिल्लीत तब्बल 27 वर्षानंतर भाजप सत्तेत आला आहे.
विशेष म्हणजे या निवडणुकीत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. भाजपच्या प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा 1844 मतांनी पराभव केला आहे. त्याचवेळी सिसोदिया यांचा जंगपुरा येथून भाजप उमेदवार तरविन सिंग मारवा यांनी 600 मतांनी पराभव केला.
यंदाच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला खातंही उघडता आलेलं नाहीये. सलग तिसऱ्यांदा काँग्रेसला दिल्लीत खातंही उघडता आलेलं नाही. म्हणजे गेल्या 15 वर्षापासून दिल्लीत काँग्रेसचा एकही आमदार नाहीये.