---Advertisement---

नाशिकमध्ये आमदाराच्या त्रासाला कंटाळून काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षांचा आत्महत्येचा प्रयत्न

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात आमदाराच्या त्रासाला कंटाळून काँग्रेसच्या पदाधिकारी तालुका अध्यक्ष शीतल रामराव महाजन यांनी विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नेमकं काय घडलं ?
नाशिक जिल्ह्यातील कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार व त्यांच्या पत्नी जयश्री पवार ह्या कोणत्या ना कोणत्या कारणाने खोट्या तक्रारी करून ग्रामसेवक असलेल्या पतीस त्रास देतात. म्हणून काँग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या शीतल महाजन या महिलेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कळवण येथे घडली आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी या महिलेने तशी चिठ्ठी देखील लिहून ठेवल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमदार नितीन पवार व जयश्री पवार यांच्या विरोधात काम केल्यामुळे शीतल महाजन यांच्या ग्रामसेवक पतीला खोट्या तक्रारी करून अटकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, अनेकवेळा चौकशी होऊनही तक्रारीत तथ्य आढळलेले नाही. तरीही, जाणीवपूर्वक त्रास सुरूच होता, असे महाजन यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. नुकतेच विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार नितीन पवार यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करत ग्रामसेवक रामराव महाजन यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. आमदार महोदयांकडून जाणीवपूर्वक होत असलेल्या याच त्रासाला कंटाळून शीतल महाजन यांनी विषारी औषध घेऊन स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शीतल महाजन यांचे बंधू योगेश गायकवाड यांनी केला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---