---Advertisement---

नाशिकमध्ये उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन; कधी आणि कुठे होणार?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) व महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या संयुक्त विद्यामाने खुल्या प्रवर्गातील लक्षीत गटातील उमेदवारांसाठी 4 ते 21 फेब्रुवारी 2025 या कालवाधीत उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. इच्छुकांनी 4 फेब्रुवारी 2025 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह एमसीईडी उद्योग भवन, 11, पहिला मजला, आय टी आय सिग्नल जवळ, सातपूर येथे उपस्थित रहावे, असे आवाहन नाशिक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी आलोक मिश्रा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

या प्रशिक्षणात सोलर पॅनल उभारणी, दुरूस्ती व देखभाल, बेकरी पदार्थ निर्मिती, आयात- निर्यात/ इम्पोर्ट एक्सपोर्ट या तीन विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाचे आयोजन नाशिक येथे विभागीय स्तरावर करण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील निवासी ब्राम्हण, मारवाडी, गुजराती, सिंधी, ठाकूर इत्यादी खुल्या प्रवर्गातील उमेदवार अर्ज करू शकतात.

प्रशिक्षणासाठी उमेदवार (स्त्री व पुरूष दोन्ही) हा खुल्या प्रवर्गातील व किमान इयत्ता 12 वी किंवा आय.टी.आय. अथवा डिल्पोमा पास असणे आवश्यक आहे. उमदेवारांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असावे. उमेदवाराकडे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रक, आधारकार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचा दाखला किंवा ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, बँक पासबुक व विवाहित महिलांनी नाव बदलल्याचे पुरावा इत्यादी कागदपत्रांसह हजर रहावे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---