---Advertisement---

वाहनधारकांच्या खिशाला फटका! आजपासून CNG गॅसच्या किमतीत वाढ

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२५ । एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर अनेक कालावधीपासून स्थिर असून इंधन दरातून कधी दिलासा मिळेल याची उत्सुकता वाहनधारकांना आहेत. मात्र यातच वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजेच CNG गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे. आज ७ एप्रिलपासून नवीन दर लागू झाले असून यामुळे वाहनधारकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे.

ही दर वाढ इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (CNG Price) किंमतीत झाली आहे. सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो १ ते ३ रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो १ रुपयांनी वाढ झाली आहे. तर इतर शहरांमध्ये सीएनजी प्रति किलो ३ रुपयांनी वाढला आहे.जून २०२४ नंतर तब्बल दहा महिन्यांनी पहिल्यांदाच सीएनजीच्या किंमती वाढणार आहे.

आयजीएसलच्या एकूण सीएनजी विक्रीपैकी ७० टक्के विक्री ही दिल्लीतून होते. बाकीचे ३० टक्के इतर ठिकाणांवरुन येते. सीएनजीचे दर वाढल्यानंतर दिल्लीत सीएनजी ७६.०९ प्रति किलोवर विकले जात आहे. तर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजी ८४.७० रुपये प्रति किलोवर विकले जात आहे.मुंबईत आज सीएनजी ७७ रुपये प्रति किलोवर विकले जात आहे.

आज सीएनजीच्या किंमती वाढल्याने वाहनधारकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. भारतात सीएनजीवर चालणाऱ्या अनेक गाड्या आहेत. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सीएनजी कार खरेदीत वाढ झाली आहे. मात्र, आता सीएनजीच्या किंमतीतही वाढ झाल्याने वाहनधारकांना चांगलाच फटका बसणार आहे. सीएनजीच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट मात्र कोलमडणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---