जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२५ । जनतेच्या आरोग्यसेवेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय मुंबई,जिएम फाऊंडेशन,जळगाव,भारतीय जनतापार्टी, नाशिक शहर पदाधिकारी व आमदार सिमा हिरे, आमदार देवयानी परांदे,आमदार राहुल टिकले यांच्या सहकार्याने आणि नाशिक जिल्हा प्रशासन, यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबीर हे १७ मे २०२५ ते २३ मे २०२५ या कालावधीत नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ४३ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी मा.ना.श्री.गिरीशभाऊ महाजन (जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री, महाराष्ट्र राज्य), यांच्या वाढदिवसा निमित्त ‘‘आरोग्य सेवा सप्ताह ’’ आयोजित करण्यात येत आहे.
या आरोग्य शिबीरामध्ये रुग्णांची मोफत तपासणी, रोग निदान जसे शस्त्रक्रिया, लिव्हर ट्रान्सप्लांट,किडनी ट्रान्सप्लांट, कॅन्सर इ. आजारांवर या विशेष उपक्रमाअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी तसेच नोंदणीकृत धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना पूर्णतः मोफत उपचार व शस्त्रक्रिया सेवा दिली जाणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन आज दि. १७/०५/२०२५ रोजी मंत्री गिरीश महाजन (जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री) यांच्या हस्ते तसेच भाजपा लोकप्रतिनीधी व पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, धर्मदाय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
उपक्रमाची वैशिष्ट्ये:
* नाशिक महापालिका क्षेत्रातील ४३ ठिकाणी दररोज ७ दिवस शिबिरे
* विशेषज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी
* रक्त तपासणी, ईसीजी यांसारख्या चाचण्या मोफत
* महात्मा फुले योजनेत मोफत शस्त्रक्रिया व उपचार
* तत्काळ आभा कार्ड सरकारी योजनांमध्ये नोंदणीची सुविधा
* महिला, वृद्ध, दिव्यांग, व गरजू रुग्णांना प्राधान्य
या शिबिरांत सर्जरी, ऑर्थोपेडिक, ईएनटी, नेत्र, स्त्रीरोग, जनरल मेडिसिन, हृदयरोग, कर्करोग, मूत्रविकार, त्वचारोग व बालरोग तज्ज्ञांची उपस्थिती राहणार आहे. रुग्णांना त्यांच्या आजारांनुसार पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयांमध्ये संदर्भपत्र दिले जाणार असून, धर्मादाय रुग्णालयांत मोफत शस्त्रक्रिया करता येणार आहे.
शिबिराचे स्थळ: नाशिक रोड
१) सिन्नर फाटा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
२) गोरवाडी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
३) दसक शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
४) वडनेर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
५) सिन्नर फाटा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र,चाडेगाव मनपा शाळा
६) गोदावरी सोसायटी आरोग्य वर्धिनी केंद्र
नाशिक पूर्व
१) बजरंग वाडी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
२) भारत नगर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
३) डॠच शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
५) धम्मनगर आरोग्य वर्धिनी केंद्र
६) मनिकषा नगर आरोग्यवर्धिनी केंद्र
७) नागझरी आरोग्यवर्धिनी केंद्र
८) उपनगर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
नाशिक पश्चिम
१) पंचशिल नगर आरोग्यवर्धिनी केंद्र
२) सिव्हील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
३) जिजामाता शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
४) तिडके कॉलनी आरोग्यवर्धिनी केंद्र
५) रंगारवाडा आरोग्यवर्धिनी केंद्र
६) मल्हारखान आरोग्यवर्धिनी केंद्र
पंचवटी
१) शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र,म्हसरुड
२) आरोग्यवर्धिनी केंद्र, वडजे नगर
३) शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पंचवटी (सावित्रिबाई फुले मायको
हॉस्पिटल)
४) आरोग्य वर्धिनी केंद्र, वाल्मीक नगर
५) शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मखमलाबाद (मनपा शाळा, मखमलाबाद)
६) आरोग्य वर्धिनी केंद्र, समर्थ नगर
७) शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, रामवाडी (समाज मंदीर, दत्तनगर)
८) शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, तपोवन (मनपा शाळा, नांदुरगाव)
९) आरोग्य वर्धिनी केंद्र,आडगाव
१०) शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हिरावाडी सेंटर
सातपुर :
१) शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मायको सातपुर
२) शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, संजीव नगर
३) शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, चकइ कॉलनी
४) शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, गंगापुर
५) आरोग्य वर्धिनी केंद्र,प्रबुध्द नगर
सिडको :
१) शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कामटवाडे
२) शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, सिडको (निलांजल हॉल आरोग्य वर्धिनी
केंद्र, गणेश चौक
३) शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, अंबड (आपला दवाखाना घरकुल,चुंचाळे)
४) शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मोरवाडी (आपला दवाखाना अंबड मंडई,
उपेंद्रनगर)
५) शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंपळगाव खांब (पाथर्डी गाव)
६) शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, अंबड (मनपा शाळा क्र. ७७/७८, अबंडगाव)
७) शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पवननगर
८) शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ,पिंपळगावखांब (आरोग्य वर्धिनी
केंद्र,पिंपळगाव खांब)
शिबिराचा उद्देश:
या उपक्रमाचा मुख्य उद्देश शहरी गरीब, कामगार, महिला, वृद्ध, दिव्यांग आणि दुर्बल घटकांपर्यंत मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवणे हा आहे. अनेक वेळा आर्थिक अडचणींमुळे रुग्ण वेळेवर उपचार घेऊ शकत नाहीत. अशा रुग्णांसाठी ही शिबिरे म्हणजे वरदान ठरणार आहेत.
रुग्णांची निवड व उपचार प्रक्रिया:
शिबिरांमध्ये उपस्थित राहणार्या रुग्णांची प्राथमिक तपासणी तिथेच केली जाईल. आवश्यक त्या चाचण्या व तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर, शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांची यादी तयार करून, धर्मादाय रुग्णालये व महात्मा फुले योजना संलग्न रुग्णालयांमध्ये मोफत उपचारासाठी पाठवण्यात येईल.
नागरिकांसाठी सूचना:
सर्व नागरिकांनी शिबिरात येताना आधारकार्ड, आभा कार्ड, गोल्डन कार्ड (असल्यास) आणि आधीचे वैद्यकीय अहवाल सोबत आणावेत.
शिबिराची वेळ सकाळी ९:०० ते दुपारी १:०० या वेळेत केली जाईल. रुग्णांच्या सोयीसाठी स्वयंसेवक व समुपदेशकांची टीम प्रत्येक ठिकाणी उपस्थित असेल.
सहकार्य करणार्या संस्था:
या उपक्रमासाठी नाशिक महानगरपालिकेसह जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, धर्मादाय रुग्णालये, खासगी डॉक्टर संघटना आणि महात्मा फुले आरोग्य योजनेचे अधिकृत प्रतिनिधी एकत्र येऊन कार्य करणार आहेत. या भव्य आरोग्य शिबिरामध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने
सहभागी होऊन, आरोग्यसेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक महानगरपालिका आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय मदत कक्ष, मंत्रालय मुंबई यांनी केले आहे.अधिक माहिती आणि शिबिराचे ठिकाण व वेळ जाणून घेण्यासाठी नागरिकांनी नजीकच्या महापालिका आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा-०२५३ -२५९००४९