---Advertisement---

अखेर छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान; आज होणार शपथविधी

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २० मे २०२५ । राज्याच्या राजकारणामधून मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेले मंत्रिपद त्यांना दिले जात आहे. मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते होते. तेच खाते भुजबळ यांच्याकडे दिले जाईल.

छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. आज सकाळी १० वाजता मुंबईतील राजभवनात त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. शपथविधी समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे व अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील. राज्यात भाजप-शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे सरकार आल्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या विस्तारावेळी भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नव्हती.

त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज होते. पण आता त्यांना मंत्रिपद देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महायुतीकडून करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.
मात्र आता धनंजय मुंडे यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर ते आज मंत्रिपदाची शपथ घेतील.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---