नाशिक लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२५ । नाशिक मार्गे धावणाऱ्या कामयानी, काशीसह काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. गाडी क्र. १५०१७ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर काशी एक्स्प्रेस ही १८ फेब्रुवारी रोजीची गाडी इटारसी, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, बाराबंकी मार्गे गोरखपूर मार्गे जाईल. क्र. ११०७१ लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस १७ फेब्रुवारी रोजी बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, जौनपूर मार्गे वाराणसी जाईल.
क्र. १५०१८ गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस काशी एक्स्प्रेस ही गाडी १७ व १८ रोजी बाराबंकी, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, बीना, इटारसी मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस अशी धावेल. ११०७२ ही वाराणसी-लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्स्प्रेस गाडी १७ व १८ रोजी जौनपूर, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, बीना मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस अशी धावणार आहे.
झेलम एक्स्प्रेस रद्द
जम्मू तावी रेल्वे स्थानकावर पुनर्विकास आणि यार्ड कनेक्शनसंदर्भातील नॉन-इंटरलॉकिंग कार्य सुरू आहे. त्यामुळे भुसावळ विभागातून जाणारी झेलम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. गाडी क्र. ११०७७ – पुणे ते जम्मूतावी एक्स्प्रेस, १७ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत तर क्र. ११०७८ जम्मू तावी ते पुणे एक्स्प्रेस ही गाडी १९ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीत रद्द राहील, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.