---Advertisement---

४ हजाराची लाच भोवली; चांदवडला महिला तलाठ्यासह एकाला रंगेहात पकडले

lach
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२५ । नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने महिला तलाठयासह एका खासगी दलालास ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली असून यामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी ज्ञानेश्वर एकनाथ बरकले (३४, परसूल) व तलाठी विशाखा भास्कर गोसावी (३७, नाशिक) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात चांदवड पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कायद्यान्वये सोमवार (दि.3) रोजी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु होते.

नेमका प्रकार काय?
तालुक्यातील ३३ वर्षीय तक्रारदार यांची वारसा हक्काने हिस्सा वाटणी झालेल्या तळवाडे येथील शेत जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद लावून देण्याच्या मोबदल्यात एजंट ज्ञानेश्वर एकनाथ बरकले (३४, परसूल) व शैलू सजाच्या तलाठी विशाखा भास्कर गोसावी (३७, नाशिक) यांनी ८ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यात तडजोडीनंतर ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवार (दि.३) रोजी सायंकाळच्या सुमारास सापळा रचत अटक केली. एजंट बरकले यांच्याकडे एक मोबाईल सापडला असून त्यांची कसून चौकशी सुरु होती. हि कारवाई पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश खैरनार, अविनाश पवार, शिपाई परशराम जाधव आदींनी केली.

एका महिन्यात तिघांना अटक
चांदवड तालुक्यातील शासकीय अधिकारी, कर्मचा-यांमध्ये लाचीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील महिन्याच्या १३ फेब्रुवारी रोजी रायपुरचे मंडळ अधिकारी प्रवीण प्रसाद यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. या घटनेला विसरत नाही तोच आज पुन्हा तलाठी अन एक खासगी दलाल यांना ४ हजार रुपयांची लाच घेताना अटक झाल्याने महसूल विभागाचा कारभार चांगलाच चव्हाट्यावर आला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---