---Advertisement---

चांदवडच्या कृउबा सभापती संजय जाधवांचा राजीनामा

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । चांदवड बाजार समितीच्या १२ संचालकांनी विद्यमान सभापती संजय जाधव यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल जाधव केला होता. या अविश्वास ठरावावर आज शुक्रवारी प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या विशेष सभेपूर्वीच जाधव यांनी सभापतिपदाचा राजीनामा नाशिक जिल्हा उपनिबंधकाकडे सुपूर्द केला आहे. दरम्यान. अविश्वास ठरावाच्या एक दिवस आधी जाधव यांनी राजीनामा दिल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, आज शुक्रवारी (दि.१६) सभापतीवर होणाऱ्या अविश्वासाच्या कारवाईचे फक्त सोपस्कार पार पाडले जाणार आहेत.

चांदवड बाजार समितीच्या ‘सभापती’पदावरून गेल्या काही महिन्यांपासून कलगीतुरा बघावयास मिळाला. विद्यमान सभापती संजय जाधव यांनी राजीनामा देऊन दुसऱ्या सहकाऱ्यास संधी द्यावी, असा आग्रह धरला जात होता. मात्र, जाधव यांनी त्याकडे कानाडोळा केल्याने विद्यमान १२ संचालकांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे अविश्वास ठरावाची मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार चांदवडचे उपविभागीय प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.१६) सकाळी ११ वाजता अविश्वास ठरावावर चर्चेसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

त्यापूर्वीच विद्यमान सभापती संजय जाधव यांनी नाशिकचे जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केल्याने अविश्वास ठरावाची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. यामुळे लवकरच नवीन सभापती व उपसभापती यांची नियुक्ती होणार आहे. खुर्चीच्या या रस्सीखेचीत उर्वरित संचालकांपैकी नेमकी कोणाची वर्णी लागते याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---