नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकमधील येवला तालुक्यात देखील बिबट्यांचा वावर आता मोठ्या प्रमाणात वाढला असून तालुक्यातील ठाणगाव येथे सोपान शंकर शेळके यांच्या गीर गाईच्या गोठ्याजवळ एक बिबट्या(leopards) कुत्र्याची शिकार करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
या घटनेमुळे परिसरात बिबट्याची चांगलीच दहशत पसरली असून पिंजरा लावून त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून रात्रीच्या वेळी गावात बिबट्यांचा मुक्त संचार पाहण्यास मिळाला आहे.
आज सकाळी मनोहर बोराडे यांच्या शेतात देखील बिबट्या आढळला. बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे गावकरी दहशतीत, शेतीच्या कामांवर परिणाम झालेला असून स्थानिक प्रशासन आणि वनविभागाने त्वरित बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केलेली आहे.