---Advertisement---

नाशिकमध्ये १८१ बांगलादेशींनी घेतला पीएम किसान योजनेचा लाभ? गुन्हा दाखल

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२५ । केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या पीएम किसान योजनेबाबत नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. ज्यात नाशिकच्या कळवण तालुक्यातील भावदन येथे तब्बल १८१ बोगस मुस्लिम लाभार्थी विरोधात पीएम किसान योजनेचा लाभ घेऊन २ लाख ९८ हजार रुपये अनुदान लाटत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कळवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेंतर्गत सहा हजार रुपयांची मदत केली जाते. मात्र, भादवण गावात अस्तित्वात नसलेले १८१ बोगस लाभार्थी समोर आल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यांच्या नावांची २०२० मध्ये नोंदणी झाली असून, ई-केवायसी झाली नसल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. हे लाभार्थी परप्रांतीय असल्याचे समोर आल्याने ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी देखील ७ मार्च रोजी पोलिस, कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. शिवाय, हे बोगस लाभार्थी हे बांगलादेशी असल्याचा संशयही व्यक्त केला होता.

तालुका कृषी अधिकारी मिनल म्हस्के यांनी बोगस लाभार्थ्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यानुसार, १८१ बोगस लाभार्थ्यांनी योजनेंतर्गत नोंदणी केलेली असून त्यातील १४३ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित झालेला आहे. हा फसवणुकीचा प्रकार २६ ऑगस्ट २०२० ते ३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत घडलेला आहे. कळवण पोलिसांनी कृषी विभागाच्या तक्रारीनंतर संबंधित १८१ बोगस लाभार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---