---Advertisement---

Nashik : तिहेरी अपघातात दुचाकीस्वारासह कारचालक ठार; अन्य दोघे जखमी

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिककडून दिंडोरीकडे जाणाऱ्या दुचाकी चालकाने रस्त्यात वळण घेतल्याने पाठीमागून आलेल्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीला धडक देत कार पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला उभ्या पिकअपवर जाऊन धडकली. या दुर्घटनेत दुचाकीस्वारासह कारचालक असे दोघेजण ठार, तर इतर दोघेजण जखमी झाल्याची घटना दिंडोरीरोडवर म्हसरूळ जुना जकात नाक्याजवळ घडली.

मनोज ओमकार पवार (३६) व वैभव कचरू राजगुरू (२७, रा. वलखेड ता. दिंडोरी) असे अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत, तर सागर शांताराम बोडके जखमी युवकाचे नाव आहे. याबाबत म्हसरूळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, म्हसरूळ गावातील मनोज पवार त्याच्या ताब्यातील दुचाकीवरून (एम.एच. १५ जी.एच. ८०८६) जुना जकात नाक्याकडून दिंडोरीकडे जात होते. पाठीमागून आलेल्या कारने (एम.एच. ४१ सी. ७८७४) दुचाकीला धडक दिली. चालक वैभव राजगुरू याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या करेला भ्या पिकअवर धडकली

मदतीला धावलेला भाऊ गंभीर जखमी
जुना जकात नाक्याजवळ अपघातात मनोज पवार जखमी झाल्याची माहिती भाऊ प्रसाद पवार, यश पवार यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत म्हसरूळ पोलिसांच्या मदतीने जखमी मनोजला रुग्णालयात नेण्याबाबत प्रसादने सांगितले. पोलिस वाहनातून जखमी मनोजला रुग्णालयात नेताना प्रसाद पोलिस वाहनामागे दुचाकीने जात असताना तारवालानगर ते अमृतधाम लिंकरोडवर गुंजाळबाबा चौकात दुचाकी घसरल्याने त्यात प्रसाद हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे म्हसरूळ पोलिसांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---