---Advertisement---

नाशिकमध्ये रिक्षाचालकांची सर्रास दादागिरी ; भरचौकात कारचालकासह कुटुंबाला मारहाण, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकमध्ये गुन्हेगारी डोकंवर काढत असून हत्या, हल्ले, मारहाण यासारख्या घटना रोज समोर येत आहे. अशातच सर्वसामान्यांवर रिक्षाचालकांची सर्रास दादागिरी आणि झुंडशाही नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे.

भरचौकात रिक्षाचालकाने कारचालकासह त्याच्या कुटुंबाला मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शहरातील अनधिकृत रिक्षाचालकांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

अनधिकृत रिक्षाचालकांकडून सर्वसामान्यांवर सर्रास दादागिरी केली जात आहे. शालिमार चौकात रिक्षा चालकांची झुंडशाही मोबाईल कॅमेरात कैद झाली आहे. रिक्षाला कारचा कट लागल्यामुळे संतप्त झालेल्या रिक्षाचालकाने कारचालकासह कुटुंबाला मारहाण केली.

कारमधील महिला हात जोडून माफी मागत असताना देखील रिक्षाचालक रस्त्यामध्ये रिक्षा आडवी लावून राडा करताना दिसला. माफ करा असं वारंवार बोलून देखील रिक्षाचालक राडा करतच राहिला. नाशिकमध्ये अनधिकृत रिक्षाचालकांचा हैदोस सुरूच आहे. पोलिस प्रशासन मात्र गप्प असल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्यांवर रिक्षाचालकांची सर्रास दादागिरी आणि झुंडशाही नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---