---Advertisement---

नाशिकमध्ये भरदिवसा व्यावसायिकाचे अपहरण करून मागितली १ कोटींची खंडणी

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२५ । नाशिक शहरात भरदिवसा घडलेल्या अपहरणाच्या प्रकारामुळे खळबळ माजली आहे. कार डेकोर व्यावसायिकाला तिघांनी पिस्तुलचा धाक दाखवत व्यावसायिकाच्याच गाडीतून अपहरण केले. त्याला इगतपुरी येथे नेत १ कोटी रुपये खंडणीची मागणी करण्यात आली. एवढी मोठी रक्कम नसल्याचे सांगत १५ लाखांवर तडजोड झाल्यानंतर भावाने शहरात अपहरणकर्त्याच्या साथीदाराला खंडणीची रक्कम दिली आणि संशयितांनी व्यावसायिकाला मुंबई आग्रारोडवरील फाळके स्मारक परिसरात सोडून देत पलायन केले. या धक्कादायक घटनेनंतर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. पोलिस प्रशासनालाही या घटनेनं मोठं आव्हान दिलं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

हॉटेल व्यावसायिक निखील दर्याणी यांच्या कारचा पाठलाग करून, सिग्नलवर गाडी थांबल्यावर काही जणांनी त्यांच्याशी बोलण्याचा बहाणा केला. अचानक पिस्तूलाचा धाक दाखवत आरोपी त्यांच्या गाडीत शिरले आणि त्यांचे अपहरण केले. हा प्रकार भरदिवसा घडल्याने शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.अपहरण केल्यानंतर गाडीतच अपहरणकर्त्यांनी निखील दर्याणी यांना त्यांच्या कुटुंबीयांना कॉल करण्यास भाग पाडलं आणि १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने प्रतिसाद दिला. निखील यांचे बंधू यांनी १५ लाख रुपये तत्काळ देण्याची तयारी दर्शवत, भावाला सोडण्याची विनंती केली. या सगळ्या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.

१५ लाखांची रक्कम मिळाल्यानंतर अपहरणकर्त्यांनी निखील दर्याणी यांना उपनगर सिग्नलवर बोलावलं आणि पैसे स्वीकारले. त्यानंतर त्यांनी त्यांना गरवारे पॉईंटकडे नेत धूम ठोकली. मात्र, प्रसंगावधान राखत निखील दर्याणी यांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. ही बाब लक्षात येताच आरोपी घाबरले आणि कार तिथेच सोडून पसार झाले. अपहरण प्रकरणातून सुटल्यावर निखील दर्याणी यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना केलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, घटनेची माहिती बाहेर येताच संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---