---Advertisement---

नाशकातील व्यावसायिकाचा मलेशियात पाण्यात बुडून मृत्यू

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । कुटुंबीय आणि मित्रांसोबत पर्यटनासाठी मलेशिया येथे गेलेल्या नाशकातील व्यावसायिक विवेक अग्निहोत्री यांचे समुद्रातून फिरत असताना धाप लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने कुटुंबियांसह मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे.

सिडको येथील अश्विननगरातील रहिवासी आणि सीएट कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या विवेक अशोकराव अग्निहोत्री (५४) यांचे मंगळवारी (दि. १८) निधन झाल्याचे वृत्त त्यांच्या कुटुंबियांकडून समजले. अग्निहोत्री यांनी जमीन खरेदी-विक्री व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या व्यवसायातील मित्रांच्या कुटुंबियांसोबत ते गेल्या आठवडाभरापूर्वी सिंगापूर, मलेशिया दूरवर गेले होते.

त्यातच मलेशिया येथे समुद्रावर प्रवास करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई असा परिवार आहे. महाऊर्जा विभागातील पुणे कार्यालयात महाव्यवस्थापक अनंत अग्निहोत्री यांचे ते कनिष्ठ बंधू होत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---