---Advertisement---

नाशिकमध्ये घरफोडीचे सत्र सुरूच ; बंद घर फोडून लाखोंची रोकड लंपास

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२५ । नाशिक शहरासह जिल्ह्यात घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसून येत आहे. अशातच आता दोन दिवसांत भरदिवसा बंद घरांना लक्ष्य करत घरफोडी करण्यात आली. कुटे मार्गावरील एका इमारतीमध्ये फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून तीन लाख ८० हजारांचे दागिने चोरी करण्यात आले.

दोन दिवसांत दोन मोठ्या घरफोड्या झाल्याने पोलिसांच्या गस्तीवर प्रश्न उपस्थित होत आहे. कुटे मार्गावरील प्रिन्स टॉवरमधील मुथा यांच्या घरी झालेल्या घरफोडीबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुथा सकाळी १२ ते रात्री ९ या कालावधीत कामानिमित्त बाहेर असताना फ्लॅटच्या दरवाजाचे लॉक तोडून घरामध्ये प्रवेश करत ३ लाख ८० हजारांची रोकड चोरी करण्यात आली.

इमारतीमध्ये सुरक्षारक्षक असताना घरफोडीचे गुन्हे घडत आहे. दोन दिवसांपूर्वी तिडके कॉलनी वैधील एका व्यावसायिकाच्या घरातून ७ लाखांचे दागिने चोरी करण्यात आले होते. ही घटना ताजी असताना दुसरी घरफोडी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---