---Advertisement---

Budget 2025 : मध्यमवर्गीयांना दिलासा, 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कर नाही; नवीन कर प्रणाली कशी आहे?

tax (1)
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२५ । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला असून यादरम्यान त्यांनी मध्यमवर्गीयांसाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजेच १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही कर लागणार नाही.

नव्या करप्रणालीमध्ये देखील मोठे बदल करण्यात आले आहेत. अर्थमंत्र्यांनी नवीन कर प्रणाली देखील जाहीर केली आहे. स्टँडड डिडक्शन ५० हजारांवरून ७५ हजार रुपये करण्यात आले आहे. सरकार पुढील आठवड्यामध्ये नवं विधेयक आणणार आहे.

नोकरदारवर्गासाठी दिलासा?
अर्थमंत्र्यांच्या घोषणानंतर नव्या कररचनेअंतर्गत १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. महिन्याला १ लाख उत्पन्न असणाऱ्यांना यापुढे कुठलाही कर लागणार नाही. तर १८ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ७० हजारांची सूट मिळणार आहे. २५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर १ लाख २० हजारांची सूट मिळणार आहे. नवीन कर प्रणाली कशी आहे हे जाणून घेणं प्रत्येकासाठी गरजेचे आहे.

नवीन कर प्रणाली कशी आहे –
०-४ लाख – ० टक्के
४-८ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर – ५ टक्के
८ ते १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर- १० टक्के
१२ ते १६ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर – १५ टक्के
१६ ते २० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर – २० टक्के
२० ते २४ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर – २५ टक्के
२४ लाखांच्या वरील उत्पन्नावर – ३० टक्के

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---