नाशिक लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२५ । गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात बुधवारी वडोदरा आणि आणंदला जोडणारा गंभीरा पूल कोसळल्याने एक मोठी दुर्घटना घडली. या अपघातात किमान ९ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. पूल कोसळताच पाच वाहने थेट नदीत पडली.
हा अपघात पद्रा परिसरात घडला जिथे महिसागर नदीवर बांधलेला गंभीरा पूल ४३ वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना आज बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली.
પાદરા પાસે મુજપુર ગંભીરા બ્રિજ વહેલી સવારે અચાનક વચ્ચેથી તૂટી ગયો, અનેક વાહનો નદીમાં પડ્યા વાહનચાલકોની શોધખોળ શરૂ કરાઈ. સ્ટેટ R&B વિભાગના અધિકારીઓની લાલીયાવાડી, બેદરકારીના કારણે મોટી દુર્ઘટના સર્જાઈ #viral #reels #video #vadodara #trending #gujarat #bridge #collapse #government pic.twitter.com/A4GLJYWpxz
— RAVI MACHHI (@ravinvarma) July 9, 2025
वडोदरा जिल्हाधिकारी अनिल धामेलिया म्हणाले की, आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ६ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांना चांगल्या उपचारांसाठी वडोदरा एसएसजी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. बचाव कार्य अजूनही सुरू आहे आणि एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळी उपस्थित आहेत.