नाशिक लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२५ । नाशिकमध्ये खोदण्यात आलेल्या कृत्रिम खड्ड्यात तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आणखी एका ९ वर्षीय मुलाचा बांधकाम साईटवर खोदलेल्या खड्ड्यात पडून झाला. मयूर संजय भोंडवे (वय ९) असे मृत मुलाचे नाव असून ही घटना नाशिक अंबड लिंकरोडवरील सातपूर शिवारात असलेल्या भोर टाऊनशिपजवळ मोकळ्या मैदानात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आलं आहे. दोन दिवसांत हि दुसरी घटना असून यात चार अल्पवयीन मुलांचा मूत्यू झाला आहे.
दरम्यान खड्ड्यात पाणी साचलेले होते. याच परिसरात तीन ते चार शाळकरी मुले खेळत होती. जवळच एका गृहप्रकल्पासाठी खोदललेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावासाचे पाणी साचलेले होते. मुले खेळत असताना या खड्ड्यात नऊ वर्षीय मुलगा पाय घसरून तो पडला. यावेळी प्रसंगावधान दाखवत आझाद शेख या युवकाने खड्ड्यात उडी घेत बुडणाऱ्या मयूर संजय भोंडवे या शाळकरी मुलाला बाहेर काढले. यानंतर त्यास शासकिय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आपत्कालीन कक्षात रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
दोन दिवसात चार मुलांचा बळी
दोन दिवसांत ही दुसरी घटना नाशिक शहरात घडली आहे. विडी कामगार नगरमधील अमृतधाम येथे गृहप्रकल्पाच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तिघा मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली होती. या घटनेची पुनरावृत्ती बुधवारी सातपूर भागात झाली. केवळ बिल्डरांच्या निष्काळजी पणामुळे मुलांचा बळी गेल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आलं आहे.