सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या बँक ऑफ इंडियामध्ये (Bank Of India) भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा. अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2025 पर्यंत आहे. या भरतीच्या माध्यमातून १८० जागा भरल्या जाणार आहे. BOI Recruitment 2025
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) चीफ मॅनेजर 21
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc (Computer Science/ Information Technology/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) किंवा MCA (ii) 07/08 वर्षे अनुभव
2) सिनियर मॅनेजर 85
शैक्षणिक पात्रता : i) 60% गुणांसह B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc (Computer Science/ Information Technology/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) किंवा MCA (ii) 05 वर्षे अनुभव
3) लॉ ऑफिसर 17
शैक्षणिक पात्रता : (i) विधी पदवी (LLB) (ii) 04 वर्षे अनुभव
4) मॅनेजर 57
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc (Computer Science/ Information Technology/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) किंवा MCA (ii) 03 वर्षे अनुभव
किमान वयोमर्यादा २८ वर्षे आणि कमाल ४५ वर्षे आहे.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
परीक्षा शुल्क :
या पदांसाठी, अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर सामान्य आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ८५० रुपये आहे. शुल्क फक्त मास्टर/व्हिसा/रुपे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, कॅश कार्ड/मोबाइल वॉलेट्स, क्यूआर किंवा यूपीआय वापरून भरता येईल.
निवड प्रक्रिया
ऑनलाइन परीक्षा – ज्यामध्ये इंग्रजी, व्यावसायिक ज्ञान आणि सामान्य ज्ञान असे विभाग असतात.
मुलाखत – ऑनलाइन परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
अंतिम गुणवत्ता यादी – दोन्ही टप्प्यांमधील कामगिरीवर आधारित.
अर्ज कसा करायचा
bankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
“करिअर” विभागावर क्लिक करा आणि संबंधित भरती सूचना निवडा.
वैध ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरसह नोंदणी करा.
ऑनलाइन अर्ज फॉर्ममध्ये योग्य माहिती भरा.
आवश्यक कागदपत्रे (छायाचित्र, स्वाक्षरी, प्रमाणपत्र) अपलोड करा.
अर्ज शुल्क ऑनलाइन भरा आणि फॉर्म सबमिट करा.
भविष्यातील संदर्भासाठी अर्ज पुष्टीकरण डाउनलोड करा आणि प्रिंट करा.