---Advertisement---

महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत मोठा निर्णय; विद्यार्थी-पालकांनो वाचा काय आहे..

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजेच राज्यातील सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा या एकाच वेळी घेण्यात याव्यात, अशा सूचना शिक्षण उपसंचालक (प्रशासन) रजनी रावडे यांनी दिल्या आहेत.

राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग व्हावा यासाठी वार्षिक परीक्षा व संकलित चाचणी २, नियतकालिक मूल्यांकन (पीएटी) चाचण्यांचे आयोजन एकाच वेळी केले जाणार आहे.

यानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये परीक्षा आणि सुट्ट्या एकाच वेळी असतील. पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा ८ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान होणार असून, १ मे रोजी निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर २ मेपासून उन्हाळी सुट्टी सुरू होईल. या निर्णयामुळे राज्यभरातील सुमारे ९०,००० शाळांना नव्या शैक्षणिक वेळापत्रकाचे पालन करावे लागणार आहे.

खरंतर राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा साधारणपणे मार्चअखेरीस अथवा एप्रिल महिन्यामध्ये शाळास्तरावरून घेण्यात येतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थी उपस्थिती पुरेशी असत नाही. अशा पद्धतीने परीक्षांचे आयोजन वर्षअखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होतो. तसेच प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते. यासाठी राज्यातील शाळांमध्ये वर्षअखेरीस घेण्यात येणारे मूल्यमापन एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (पॅट) आयोजन करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---