नाशिक लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२५ । नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सायाळे शिवारात समृद्धी महामार्गाने अवैद्य रित्या गोमांस वाहतूक करणाऱ्या टोयोटा कंपनीच्या कारचा अपघात झाल्याने सदर गोमांस तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कार चालक इरफान शेख (वय 25 राहणार नवरंग सिनेमा अंधेरी मुंबई) याला अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
भल्या पहाटे छुप्या पद्धतीने समृद्धी महामार्गाने वैजापूर वरून मुंबईकडे जाणाऱ्या टोयोटा कंपनीचे वाहन (क्रमांक एम एच 03 ए एफ 0463) या वाहनात अंदाजे सात ते आठ क्विंटल प्राण्यांच्या तस्करीचे मांस आढळून आल. अपघात ग्रस्त कार सुसाट वेगाने जात असताना सायाळे शिवारात मंगळवार (दि.8) रोजी सकाळी 6.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाला पाठी मागून जोराची धडक दिल्याने सदर अपघात घडला.
मात्र, ज्या गाडीवर जाऊन गोमा सिलेब भरलेली गाडी आदळली ती गाडी मात्र फरार झाली आहे. टोयोटा कार चालक इरफान शेख (वय 25 राहणार नवरंग सिनेमा अंधेरी मुंबई) यास पोलिसांनी अटक केली आहे. अपघात ग्रस्त गोमांस कार मध्ये प्लॅस्टिकच्या बॅगांमध्ये खचाखच भरलेले मांस गाडीच्या फ्रंट शिटावर व मागच्या डिक्कीत आढळून आले. महामार्गावरील वाहतूक नियंत्रण कक्ष अधिकारी यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी व्हावी पोलिसांची संपर्क साधला वावी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव गोमांस ने भरलेली कार ताब्यात घेऊन चालकास अटक केली आहे व फरार गाडीचा सीसीटीव्ही द्वारे शोध घेत आहे.