---Advertisement---

बँक ऑफ बडोदामध्ये तब्बल 4000 जम्बो भरती ; पदवी पाससाठी मोठी संधी..

bob
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. बँक ऑफ बडोदाने बंपर पदांसाठी अप्रेंटिस भरतीची घोषणा केली आहे. अर्ज प्रक्रिया आज, १९ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू झाली आहे. Bank of Baroda Apprentice Bharti 2025

या भरतीद्वारे तब्बल ४००० रिक्त जागा भरल्या जातील. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. लक्ष्यात असू द्या अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली आहे. Bank of Baroda Apprentice Recruitment 2025

भरतीसाठी अवाश्यक पात्रता :
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे.

वयाची अट : उमेदवारांचे किमान वय २० वर्षे आणि कमाल वय २८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
परीक्षा शुल्क : General/OBC/EWS: ₹800/- [SC/ST: ₹600/-, PWD: ₹400/-]
प्रशिक्षण कालावधी आणि वेतन-
उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी १२ महिने असेल. महानगर/शहरी भागातील उमेदवारांना दरमहा १५,००० रुपये स्टायपेंड दिले जाईल. ग्रामीण/निम-शहरी भागातील उमेदवारांना दरमहा १२,००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल.

निवड प्रक्रिया-
उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाईल. परीक्षेत, उमेदवारांना १०० वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील ज्यासाठी त्यांना ६० मिनिटे दिली जातील. चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग नसेल.

जाहिरात (PDF)Click Here

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---