---Advertisement---

दहावी उत्तीर्णांना खुशखबर! बँक ऑफ बडोदामध्ये ५०० जागांसाठी बंपर भरती

---Advertisement---

बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नामी संधी चालून आली आहे. बँक ऑफ बडोदाने तब्बल ५०० रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ऑफिस असिस्टंट पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात

पात्रता काय?
उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण (एस.एस.सी./ मॅट्रिक्युलेशन) असणे आवश्यक आहे. ज्या रिक्त पदांसाठी उमेदवार अर्ज करू इच्छितो त्या राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या स्थानिक भाषेत तो प्रवीण असावा (म्हणजे उमेदवाराला ज्या राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या स्थानिक भाषेत वाचता, लिहिता आणि बोलता येत असावे).

किती परीक्षा फी लागेल?
सामान्य, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹६००/- आहे आणि अनुसूचित जाती, जमाती, अपंग, माजी विद्यार्थी, DISXS आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹१००/- आहे.

अर्ज कसा कराल?
बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – bankofbaroda.in
होमपेजवर “करिअर” टॅबवर क्लिक करा आणि नंतर “करंट अपॉर्च्युनिटी” टॅबवर क्लिक करा
आता “विविध विभागांसाठी नियमित आधारावर व्यावसायिकांची भरती जाहिरात क्रमांक BOB/HRM/REC/ADVT/2025/02” साठी अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
अर्ज फी भरा आणि अर्ज फॉर्म सबमिट करा
भविष्यातील संदर्भांसाठी प्रिंटआउट घ्या
“उमेदवारांना ऑनलाइन अर्ज स्वतः काळजीपूर्वक भरण्याचा सल्ला देण्यात येत आहे कारण ऑनलाइन अर्जात भरलेल्या कोणत्याही डेटामध्ये कोणताही बदल करणे शक्य होणार नाही,” असे अधिकृत अधिसूचनेत म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---