---Advertisement---

प्रवाशांनो लक्ष द्या! बडनेरा – नाशिक मेमू गाडीच्या वेळेत बदल

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२५ । उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांमध्ये होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार गाडी क्र. 01211 बडनेरा ते नाशिक विशेष मेमू गाडीच्या वेळेत तात्पुरता बदल झाला आहे.

रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांच्या कालावधीमध्ये वाढचा निर्णय घेतलाय. गाडी क्र. 01211 बडनेरा ते नाशिक तसेच गाडी क्र. 01212 नाशिक ते बडनेरा या गाड्यांना 30 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.

बडनेरा (सकाळी 10.05 वाजता), मूर्तिजापूर (सकाळी 10.30 वाजता), बोरगाव सकाळी 10.48 वाजता, अकोला सकाळी 11.02 वाजता, शेगाव सकाळी 11.33 वाजता, नांदुरा (दुपारी 12.03 वाजता), मलकापूर (दुपारी 12.38 वाजता), बोदवड (दुपारी 1.37वाजता), भुसावळ (दुपारी 3.00 वाजता), जळगाव (दुपारी 3.35 वाजता), पाचोरा (दुपारी 4.05 वाजता), चाळीसगाव (दुपारी 4.38 वाजता), नांदगाव (दुपारी 5.20 वाजता), मनमाड (दुपारी 5.50 वाजता), लासलगाव (संध्याकाळी 6.05 वाजता), निफाड (6.25 वाजता), नाशिक (रात्री 7.05 वा.)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---