---Advertisement---

नाशिकमध्ये चाललंय काय? दोन भावडांवर हल्ला करत ६-७ जणांनी झोडलं, VIDEO व्हायरल

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२५ । राज्यासह नाशिकमध्ये गुन्हेगारीने कळस गाठला आहे. नाशिकमध्ये नुकतीच दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच बिलाचे पैसे मागितल्याच्या रागातून २ भावडांवर गावगुंडांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला.

ही घटना नाशिकच्या सातपूर परिसरात घडली. हल्ला करण्यात आलेले दोन्ही भाऊ हे हॉटेल मालक आहेत. ६ ते ७ जण हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. जेवण झाल्यानंतर दोघा भावडांनी गावगुंडांकडे पैसे मागितले. पैसे मागितल्याचा राग गावगुंडांना आला. त्यांनी दोघा भावडांवर मारहाण करायला सुरूवात केली. ‘हॉटेल कसे चालवतो ते बघतोच’ अशी धमकी देत त्यांनी भावडांवर हल्ला केला.

या मारहाणीत दोघे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. घटनेचा थरार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयित आरोपींविरोधात नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. यापूर्वी देखील संशयितांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींविरोधाक कठोर कारवाई करावी, तसेच आरोपींना अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---