---Advertisement---

अरे वा! आता धावत्या रेल्वेतही ATM सेवा ; पंचवटी एक्स्प्रेसमध्ये सुविधा सुरु..

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२५ । नाशिकमार्गे धावणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना मिळणार एटीएमचा लाभ मिळणार आहे. धावत्या ट्रेनमध्ये एटीएम सुविधा उपलब्ध करण्यात मध्य रेल्वेला यश आले आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी एक क्रांतिकारी उपक्रम सुरू करत नव्या युगाची सुरुवात केली आहे. रेल्वे प्रवास अधिक आधुनिक आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने, भुसावळ विभागाने महाराष्ट्र बँकेच्या समन्वयाने धावत्या गाडीत देशातील पहिली ऑनबोर्ड एटीएम सेवा सुरू करण्यासाठी चाचण्या सुरू केल्या आहेत

सध्या गाडी क्रमांक १२११० मनमाड–मुंबई सीएसएमटी – मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये या सेवेच्या व्यवहार्यता व कार्यक्षमतेची चाचणी सुरू आहे. ही गाडी दररोज मनमाड ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावते. एकूण २२ डब्यांच्या या गाडीची आसन क्षमता २०३२ असून दररोज सुमारे २२०० प्रवासी दररोज प्रवास करतात. संपूर्ण गाडी वेस्टिब्यूल कनेक्टेड असल्यामुळे सर्व श्रेणीतील प्रवाशांना या एटीएमचा सहज लाभ घेता येणार आहे.

या सेवेसाठी प्रवाशांच्या आसनव्यवस्थेवर किंवा सुविधांवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण एटीएम कोचमधील पूर्वी न वापरलेल्या जागेत बसवण्यात येत आहे. ही संपूर्ण उपक्रम योजना भारतीय रेल्वेच्या विद्युत व यांत्रिक विभागांच्या समन्वयातून राबवली जात आहे.ही ऑनबोर्ड एटीएम सेवा प्रत्यक्षात अंमलात आल्यावर, प्रवाशांना प्रवासादरम्यान सहज आर्थिक व्यवहार करता येणार असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आकस्मिक गरज असलेल्या प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरेल. ही एटीएम सेवा मोबाईल नेटवर्कद्वारे सतत जोडलेली राहणार असून, गाडी सुरू असतानाही खऱ्या वेळेत व्यवहार शक्य होतील.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---