---Advertisement---

वाल्मिक कराडच्या तुरुंगातून आठवले गँगला नाशिकच्या कारागृहात हलविले

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२५ । बीड जिल्हा कारागृहात सोमवारी वाल्मिक कराड गँग आणि महादेव गित्ते यांच्यामध्ये हाणामारी झाल्याचे समोर आलं होतं. यानंतर महादेव गित्ते आणि त्याच्या चार साथिदारांना संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात हलवण्यात आलं होतं. यातच आता या मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये हालचालींना वेग आला असून बीड पोलिसांनी अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि सवाई यांना नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात गँगवॉर झाल्याची घटना घडली. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात अटकेत असलेली वाल्मीक कराड गँग आणि महादेव गिते गँग यांच्यात वाद झाला. यानंतर दोन्ही गँगमध्ये हाणामारी झाल्याची माहिती आहे. महादवे गित्तेने वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला.

त्यानंतर महादेव गित्तेसह इतर चार आरोपींना हर्सूल कारागृहात हलवल्याची आलं. महादेव गित्तेला पोलिस व्हॅनमधून नेत असताना त्याने ही माहिती दिली. मारहाणीच्या घटनेनंतर महादेव गीते यासह इतर चौघांना संभाजीनगर येथील हरसुल कारागृहात हलवण्यात आले होते. दरम्यान, आज अक्षय आठवले यांच्यासह इतर दोघांना नाशिक कारागृहात पाठवण्यात आले.

दरम्यान, बीडच्या तुरुंगात वाल्मीक कराड गँग आणि गिते गँग यांच्यात गँगवॉर नेमकं कशामुळं झालं, याची माहिती समोर आली आहे. केवळ एका वाक्यामुळे बीडच्या तुरुंगात गँगवॉर भडकल्याचं सांगितलं जातंय.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---