नाशिक लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२५ । महाराष्ट्र विधानसभेत आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्पीय सादर करण्यात आला आहे. यावेळी 2027 मध्ये होणाऱ्या नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी मोठी घोषणा करण्यात आला आहे.
नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने “नमामि गोदावरी” अभियानाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. कुंभमेळ्याच्या सुव्यवस्थित आयोजनासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना करुन त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
नाशिक येथे रामकाल पथविकास प्रकल्पांतर्गत रामकुंड, काळाराम मंदिर आणि गोदातट परिसराचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी 146 कोटी 10 लाख रुपये किंमतीची कामे हाती घेण्यात येत आहेत.