---Advertisement---

लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजितदादांचं मोठं वक्तव्य; आता काय म्हणाले?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२५ । राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली. आणि या निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली आणि महायुती सरकार भरघोस मतांनी पुन्हा निवडून आलं. दरम्यान राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिल होते. आता महायुतीचे सरकार स्थापन होऊन आता 3 ते 4 महिने होत आले. मात्र त्यानंतरही लाडक्या बहिणींना दरमहिना 2100 रुपये मिळालेले नसून ते पैसे कधी मिळणार असा सवाल लाभार्थी महिलांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वच जण विचारत आहेत.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये नक्की मिळतील असं आश्वासन सरकारमधील नेते, मंत्र्यांतर्फे देण्यात आलं. पण तो दिवस कधी उजाडणार हे काही स्पष्ट झालेलं नाही. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं, सूचक विधान केलं आहे.

लाडक्या बहिणीला आपण 1500 रुपये देतोय, पण परिस्थिती सुधारली की त्यात पुढील विचार करणारा असं अजित दादा म्हणाले. पण ती वेळ नेमकी कधी येणार आणि महिलांना 2100 नेमके कधी मिळणार हे मात्र त्यांनी स्पष्ट सांगितलेले नसून ते अद्याप गुलदस्त्यातच आहे. बीडमधील कार्यक्रमात ते बोलत होते.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात.आतापर्यंत एकूण नऊ हफ्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. आता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---