नाशिक लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२५ । मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली असून संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप होत असलेल्या धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यातच माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी सुद्धा वाढताना दिसत आहेत. 30 वर्षांपूर्वीच्या एका कोर्ट केस प्रकरणात त्यांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. आज कोर्टाच्या निर्णयावर त्यांच्या मंत्रिपदच नाही तर आमदारकीचे भवितव्य ठरणार आहे.
आज नाशिक कोर्टात सुनावणी
कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांचा आज फैसला होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयावर ठरणार कोकाटे यांचे पुढील राजकीय भवितव्य ठरेल. माणिकराव कोकाटे यांच्यावर शासकीय कोट्यातील घरे फसवणुकीने मिळवल्याचा आरोप आहे. सकाळी 11.30 दरम्यान नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात होईल.