नाशिक लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२५ । राज्याचे कृषीमंत्री माणिकराव काकाटे हे एकामागून एक बेताल वक्तव्य करत असून ते सध्या चांगलेच चर्चेत आहेत. काही दिवसापूर्वी नाशिकमध्ये त्यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. कर्जमाफीच्या पैशांमधून शेतकरी लग्न आणि साखरपुडा करता, असं माणिकराव कोकाटे म्हणाले होते. यानंतर अजित पवार कोकाटे यांच्यासह इतर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना थेट मंत्रीपद काढण्याचा इशारा दिला. एकदा दोनदा चूक झाली तर समजून घेऊ मात्र, तिसऱ्यावेळी चूक केल्यास मंत्रीपद काढणार, असा इशारा अजितदादांनी दिला होता.
तरी पण कृषीमंत्री माणिकराव काकाटे यांनी पुन्हा एकदा कांद्याच्या दरावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कांद्याचे बाजारभाव पडायला शेतकरीच जबाबदार असल्याचं म्हणत त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुनावलं आहे. ‘एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून, बाकी सगळे कांदा लावत सुटतात’ असं कोकाटे यांनी म्हटलं आहे.
कांद्याचा बाजरभाव पाडण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांनाच जबाबदार धरलं आहे. दरम्यान कोकाटे यांच्या या वक्तव्यावरून आता पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलतात हे पाहणं गरजेचं आहे.